अजीर्ण - लक्षणे, प्रकार आणि घरगुती उपाय
अजीर्ण :-
योग्य प्रमाणात आहार
करुन पण ज्याचे पचन होत नाही, ते अन्न पोटात तसेच पडून राहते व त्यामूळे खालील लक्षणे दिसू लागतात. त्यालाच अजीर्ण म्हणतात.
याला इंग्रजीत Dyspepsia, Anorexia, Indigetion असे म्हणतात.
लक्षणे :-
अंग गळणे, पोट जड होणे, उत्साह जाणे, गॅस बाहेर न जाणे, अपचन, डोके दुखणे, झोप न लागणे, तोंडाला पाणी सुटणे.
उपाय :-
- संपूर्ण दिवस कडक उपवास करावा.
- गरम पाणी वारंवार प्या.
- ताकात सुंठ, मिरी चूर्ण पाव / अर्धा चमचा टाकून ताक प्यावा.
- लसणाच्या ३-४ कुड्या भाकरीच्या घासात घालून खा.
- खडीसाखर वा मध खा.
- धने व सुंठ घातलेले पाणी प्या.
- पोटाला तसेच बेंबीला तेल लावावे. पोट चोळू नये.
सर्व प्रकारची फळे आणी त्यांचे रस, मोड आलेली धान्ये,
धनेपूड, जिरेपूड असलेले पदार्थ, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, ताक.
काय खाऊ नये :-
तेलकट, तळलेले, आंबट, खारट व इंस्टटंंट फूड.
Comments
Post a Comment